माजलगाव शहरामध्ये चालणाऱ्या मटका जुगार अड्ड्यावर कारवाई ५५,९००-/ रुपयाचा मुद्देमाल जप्त

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र)

माजलगाव शहरांमध्ये नवीन बस स्टॅन्ड जवळ बाजार रोड व जुना मोंढा हे ठिकाण हमेशा गर्दीने गजबजलेले असून या ठिकाणी मटका नावाचा जुगार चोरून लपून मोठ्या प्रमाणात खेळला जातो याचा त्रास शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत अनेक तक्रारी देखील नागरिकांनी केल्या आहेत.

शहरातील नवीन बस स्थानक जवळील बाजार रोड वर व जुना मोंढा या ठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे येथे हमेशा लोकांची वर्दळ असते. याचाच फायदा घेत अवैध धंद्यावाल्यांनी आपली जुगाराची अड्डे, दुकाने येथे उभारली आहेत.

येथे चालणाऱ्या अवैध कल्याण मटका, मिलन डे, मिलन नाईट, मुंबई बाजार याची गुप्त माहिती खबऱ्या मार्फत सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत यांना मिळाली त्या आधारे त्यांच्या पथकाने नागरिकांच्या तक्रारीचे प्रथम प्रधान्याने दखल घेत नवीन बस स्टँड जवळ बाजार रोड व जुना मोंढा येथे धाडी टाकून कारवाई करत जुगार खेनारे

 1. १) रणजीत पंडितराव जाधव वय ५० वर्ष रा. आडोळा ता. माजलगाव
 2. २) श्रावण अंबादास खेरमोडे वय ४३ वर्ष रा. फुलेनगर ता. माजलगाव
 3. ३) सिद्धेश्वर भुजंगराव पवार वय २८ वर्ष रा. शिवाजीनगर ता. माजलगाव
 4. ४) संतोष सर्जेराव कदम वय ३३ वर्षे रा. आझाद नगर ता. माजलगाव
 5. ५) गोविंद सुखदेव गंधारे वय ३५ वर्ष रा. खंडोबा मैदान ता. माजलगाव
 6. ६) सुधीर भगवान गाते वय २९ वर्ष रा. शाहूनगर ता. माजलगाव
 7. ७) शेख सिकंदर शेख आयुब वय २६ वर्ष रा. फुले नगर ता.माजलगाव
 8. ८) रमेश नरहरी देशमाने वय ५० वर्ष रा. मानवत जि. परभणी
 9. ९) अभिमान तात्याबा कांबळे वय ५० वर्षे रा. सांडस चिंचोली ता. माजलगाव
 10. १०) विजय अंगदराव कदम वय ३२ वर्षे रा. साळेगाव ता. माजलगाव
 11. ११) केशव उमाजी शिंदे वय ३० वर्ष रा. हिंगणवाडी ता. माजलगाव

यांच्याकडून नगदी रक्कम व मोबाईल सह ५५,९००-/ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

तर बुकी मालक

१) शेख आसिफ शेख हरून

२) शेख जहीर शेख खदीर

३) शेख इरशाद शेख इब्राहिम

४) शेख अतिक शेख वहाब

५) सत्तार खाॅन समशेर खाॅन उर्फ गुड्डू राहणार माजलगाव यांच्याविरुद्ध

पो. ह. रविशंकरराव राठोड व पो. अं. संतराम भगवान थापडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम १२ ( अ ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली असून सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माजलगाव येथील पो. ह. रवि राठोड, पो. अं. गणेश नवले, पो. अं. तुकाराम कानतोडे, पो. अं. संतराम थापडे, पो. अं. अजय गडदे यांनी केली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks