मौजे मनुरवाडी ग्रामस्थांनी ठोकले जिल्हा परिषद शाळेला टाळे

पालकांचा व ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा उद्रेक ठोकले जिल्हा परिषद शाळेला टाळे

माजलगाव /( पृथ्वीराज निर्मळ )
तालुक्यातील मौजे मनुरवाडी येथील पालकांनी व ग्रामस्थांनी दोन शिक्षकांच्या विरोधात निवेदने तक्रारी देऊन त्यांच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे व हे शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी येत नसून हे फक्त दारू पिऊन शाळेत येतात व विद्यार्थ्यांना गुटखा वगैरे आणण्यासाठी दुकानावरती पाठवतात असे येथील संतप्त पालक व गावकरी यांच्या मधून बोलले जात आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील मौजे मनुरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये १ ते ८ पर्यंत शाळा असून या शाळेमध्ये एकूण शिक्षक संख्या ही सात असून एक शिक्षकांची रिक्त जागा आहे. परंतु या शाळेमध्ये या शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. सोळंके व श्री. आर. वाघमारे हे दोन शिक्षक शाळेला कधी वळेवर येत नसून शाळेमध्ये आले की लगेच सही करून परत जातात सतत कोणत्याही कारणावरून गैरहजर असतात. विद्यार्थी शिकविण्यात कोणता ही त्यांचा सहभाग नसतो यामुळे येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा ढासळलेले आहे. हे दोन्ही शिक्षक कोणत्याही वर्गावर जाऊन शिकवत नाहीत व हे दोघेजण शाळेमध्ये दारू पिऊन करून येतात. व शाळेतील विद्यार्थ्यांना ते बाहेर दुकानावरून गुटखा वगैरे घेऊन येण्यासाठी पाठवतात आशा भावना येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या असून यांच्या वर्तनामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे. गेल्यावर्षी सर्व पालकांनी जाऊन मुख्याध्यापक सोळुंके यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी पालकांना अरेरावीची भाषा वापरली. तरी कोणत्याही परिस्थितीत या दोन शिक्षकांची बदली करून आम्हाला दोन नवीन शिक्षक उपलब्ध करून द्या म्हणून आज दि. १७/६/२२ रोजी सकाळी १० वाजता येथील संतप्त ग्रामस्थांनी व पालकांनी आपल्या भावनांचा उद्रेक करत टाळे लावून शाळेच्या आवारात विद्यार्थी व पालक यांनी १० ते १ वाजेपर्यंत उपोषण करत गेटच्या बाहेर शाळा भरवली असून. या दोन शिक्षका वरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या शाळेमध्ये एकही शिक्षक येऊ देणार नाही किंवा आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे टि. सी. काढून घेऊ असा आक्रमक पवित्रा पालकांनी व गावकऱ्यांनी घेतला आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks