लोकमान्य टिळकांनी आपले जीवन राष्ट्रहितासाठी समर्पित केले – कुणाल दुगड

माजलगाव / प्रतिनिधी:
येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात दि.०१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार झाले. कार्यक्रमात संगीत शिक्षक चैतन्य आहेर व त्यांच्या विद्यार्थांनी ‘सवाल – जवाब’ च्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाचे अप्रतिम असे वर्णन केले.
यापुढे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार कुणाल दुगड हे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढा ही चळवळ चालवली. आपल्या विविध अग्रलेखांच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रहित जोपासले व जनजागृती केली. केसरी या वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या अग्रलेखातून तर इंग्रज सरकारच्या डोक्यात मुंग्या आल्या. त्यांनी टिळकांच्या पत्रकारितेच्या विशेष शैली सांगितल्या, असे टिळकांबद्दल विविध गुण गोष्टी सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित अंजली जोगी मॅडम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. यानंतर अध्यक्षीय भाषणातून उमेश थाटकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासीठावर मुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमेश थाटकर सर, रविंद्र खोडवे सर, ठोसर सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्वी टाक तर आभार हर्षद जोशी, सुत्रसंचालन श्रावणी गव्हाणे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम प्रमूख गवळी मॅडम, कानडे मॅडम, आहेर सर, व सर्वच शिक्षक – विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks