शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शी गद्दार मंत्री आमदारांचा माजलगावात शिवसेने कडून जाहीर निषेध

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गद्दार मंत्री वआमदारांचा माजलगावात शिवसेना कडून जाहीर निषेध

माजलगाव/ प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दार झालेल्या मंत्री आमदारांचा माजलगावात शिवसेनेच्या शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली दि.२७ जुन रोजी दुपारी १२ वाजता घोषणाबाजी करत गद्दार मंत्री व आमदारांचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसैनिकांनी गद्दार आमदारांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करुन गद्दाराच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. या निषेध आंदोलनात उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, माजी उपनगराध्यक्ष तुकाराम बापु येवले, सुनिल खंडागळे, जेष्ठ शिवसैनिक ह.भ.प.सर्जेराव काशिद महाराज, विधानसभा समन्वयक दासू पाटील बादाडे, उपतालुकाप्रमुख अतुल उगले, संजय शिंदे, माजी नगरसेवक शिवमुर्ती कुंभार, डिगांबर सोळंके, युवासेना जिल्हा समन्वयक अँड दत्ता रांजवण, युवासेना तालुका अधीकारी महेश थेटे, कल्याण बल्लाळे, प्रदीप तांबे, जयराम राऊत, बाळासाहेब मेंडके, दादा मोहिते, कामराज डाके, करण थोरात, सुखदेव धुमाळ, संभाजी पाष्टे, रुपेश घोडके, नारायण तौर, प्रल्हाद घाटुळ, महादेव वैराळे, महादेव सुरवसे, माऊली काशिद, विकास झेटे, सुरेश जाधव, तसेच युवासेना शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks