संस्कार भारतीच्या वतीने सामूहिक वंदे मातरम् संपन्न

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )

७६ व्या स्वातंत्र्यता दिनाच्या निमिताने अमृत महोत्सवी वर्ष संपन्न करीत असताना पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी १९४७ मध्ये आकाशवाणी वरून ठीक ६:३० वाजता संपूर्ण वंदे मातरम प्रसारित केले त्याचे स्मरण म्हणून संस्कार भारती माजलगावच्या वतीने संपूर्ण वंदे मातरम घोष वाक्या सहित हनुमान चौक माजलगाव येथे गायले गेले. यासाठी देवगिरी प्रांताच्या मातृ शक्ती प्रमुख स्नेहल पाठक, जिल्हा समितीचे सचिव सुरेश भानप, माजलगाव समितीचे संरक्षक प्रकाश दुगड, मार्गदर्शक प्रानेश पोरे, नाम फाऊंडेशन चे राजाभाऊ शेळके, जिल्हा समिती सदस्य संजय देशमुख यांनी प्रतिमा पूजन संपन्न केले.
शब्द सुमनांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि नंतर चैतन्य आहेर आणि युवा संघ यांनी घोष वाद्य सहित संपूर्ण वंदे मातरम तालबद्ध सुरात सादर केले. राष्ट्र भक्तीने प्रेरित वातावरण निर्माण झाले उपस्थित शंभर हुन अधिक लोकसमूहाने भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली. यासाठी भू-अलंकरण संगीता संदिकर, शुभांगी आनंदगावकर, अर्चना भानप, अनुजा जोशी यांनी केले. तर कुणाल कुलकर्णी, विपीन कांकरिया, गणेश विभुते, चैतन्य आहेर, कुणाल दुगड, सुबोध देशपांडे, दिगंबर महाजन, निरंजन वाघमारे, प्रज्ञा भानप, वैशाली वाघमारे, मनीषा शेळके, सविता देशमुख, पंढरीनाथ जोशी, सौ.खोडसकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. कार्यक्रमसाठी शहरातील अनेक मान्यवर, पत्रकार बंधू उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks