हर घर तिरंगा अभियानात सर्वानी घराघरावर तिरंगा लावून सहभागी व्हावे

माजलगाव ( वर्तमान महाराष्ट्र ) देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान हा उत्सव प्रत्येक कुंटुब आणि समाजातील सर्वस्तरातील लोकांसाठी देश अभिमान जागृत करणारा आहे .स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मे पत्कारलेल्या विरा पासून प्रेरणा घेणारा ठरेल त्यांचे स्मरण म्हणून या हर घर अभियानात घराघरावर तिरंगा लावावा असे आवाहन भाजपचे नेते मोहनराव जगताप, डॉ. प्रकाशराव आनंदगावकर, नितीन नाईकनवरे, तुकाराम येवले, शरद यादव यांनी केले.
हर घर तिरंगा अभियानाची जन जागृती करण्यासाठी माजलगाव येथील प्रभाग क्र. १ चे नगरसेवक शरद यादव यांनी दि. ८ आँगस्ट सोमवार रोजी सांयकाळी ७ वाजता दत्त मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे नेते मोहनराव जगताप हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रकाशराव आनंदगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नितीनराव नाईकनवरे, माजी नगराध्यक्ष शेख मंजुर, नानाभाऊ शिंदे, तुकाराम येवले, सौ. गौरीताई देशमुख, सौ.रूपालीताई कचरे, सुरेश एंरडे, बबनराव सिरसट, प्रा.दत्तात्रय वाळसकर, जगदीश बादाडे, विनायक रत्नपारखी, डॉ. प्रशांत पाटील, किशोर रत्नपारखी, प्रशांत भानप, अशोक किर्जत, उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. आनंदगावकर म्हणाले की, देश स्वतंत्र झाला तेव्हा ची परिस्थिती आणि ७५ वर्षात देशाची झालेली प्रगती ही देश महासत्ता बनन्यासाठी वाटचाल आहे. आज ही आपला देश सुरक्षित राहाण्यासाठी सिमेवरील जवान थंडी, वारा, ऊन, पाऊस याची तमा न बाळगता शत्रुशी लढत आहेत असे सविस्तर मार्गदर्शन केले.
या वेळी नगरसेवक शरद यादव यांनी डॉ. प्रकाशराव आनंदगावकर, नगरसेवक विनायक रत्नपारखी, सौ. गौरीताई देशमुख, तिरंगा झेंडा वाटप करणारे न. प. कर्मचारी नसरूला खान, रईसोदीन इब्राहीम, यांचा शाल पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला.
या वेळी मनोगत व्यक्त करताना
जगताप म्हाणाले की तिरंगा घरावर लावताना काळजीपूर्वक काळजी घ्यावी व तिरंगा चा अवमान होणार नाही ही काळजी घेण्याचे आवाहन केले. देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व जातीधर्माच्या क्रांती कारकांनी बलीदान दिले असल्याचे येवले यांनी सांगितले.
प्रभागातील एक ही घर तिरंगा लावण्या वाचून राहाणार नाही प्रत्येक घराला तिरंगा झेंडा घरपोच देण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
या वेळी नाईकनवरे यांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या वीराचे स्मरण व्हावे आणि अमृत महोत्सवा निमित्त प्रत्येक नागरीकांना तिरंगा लावण्याची संधी मिळाली असुन हे आपले भाग्य असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगरसेवक शरद यादव यांनी केले तर सुत्रसंचालन अॅड. जयराज सजगणे यांनी केले तर आभार फेरोज इनामदार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामुहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks