महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतंर्गत…!

बीड जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी .बाळासाहेब शेप यांची नियुक्ती

अंबाजोगाई ( प्रतिनिधी) राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्यावतीने बीड जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी बाळासाहेब शेप यांना दि. ४ जून २०२३ रोजी राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे यांनी नियुक्ती पत्र अंबाजोगाई शासकीय विश्रामगृहात येथे बैठकीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या आदेशावरून संपुर्ण राज्यात पत्रकार क्षेत्रात गेली सहा वर्षांपासून कार्य करत आहेत. महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष तथा दै. जय महभारतचे मुख्य संपादक विजयकुमार व्हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष स.का.पाटेकर तसेच अंबाजोगाई शाखेचे तालुका अध्यक्ष-अहमद पठाण , प्रसेनजित आचार्य यांच्या सह
बीड जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी .बाळासाहेब शेप यांची निवड झाल्याबद्दल अंबाजोगाई विश्राम गृह येथे भव्य मोठा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अहमद भाई पठाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are makes.

Top