तहसीलदार हटाव माजलगाव बचाव’ आंबेडकरी विचार मोर्चाची मागणी

अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू – ॲड.ए.एन. सय्यद

बीड / प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून त्यांना खत पाणी घालणाऱ्या तहसीलदार महोदयांची तात्काळ बदली करून
‘तहसीलदार हटव माजलगाव बचाव’ मागणीसाठी आंबेडकरी विचार मोर्चा तथा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड.ए.एन. सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
असे की,माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून गोदावरी व कुंडलिका नदीपात्रातून अवैध प्रकारे वाळू उपसा करून शासनाचा मोठ्या प्रमाणावर शुल्क बुळविला जात आहे वाळू माफिया खुलेआम तालुक्यात वाळू तस्करी करत आहे. पुरवठा विभाग व राशन दुकानदारांचा मनमानी कारभार सुरू आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेवर पैसा भेटत नसून जेगर्जुवांत आहे त्यांच्या नावाचा समावेश केला जात नाही.शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्पन्न व जात प्रमाणपत्रसाठी कार्यालयात चक्रे माराव्या लागतात कर्मचारी व अधिकारी वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे.
तसेच तालुक्यात गायरान जमीन,सिलिंग जमीन व ईनामी जमिनीवर भूमाफियांकडून खुलेआम मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केली जात आहेत तालुक्यात वरील शासन अंतर्गत येणाऱ्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात अवैध प्रकारे फेरफार झाले असून ते फेरफार रद्द करण्याची वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात तहसीलदार साहेबांकडे दिलेले अनेक अर्ज प्रलंबित असून ते अर्ज ही मार्गी लावले जात नाही. जे प्रलंबित आहे त्यांचे सोनवणे घेण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहे.
वरील सर्व बाबींना जबाबदार असलेल्या तहसीलदार महोदया यांची तात्काळ बदली करून माजलगाव तालुक्याला भूमाफिया,वाळू माफिया यांच्यापासून वाचविण्यात यावे अन्यथा येत्या 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे आंबेडकरी विचार मोर्चा तथा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

       #beed letest news             

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks