यात्रेनिमित्त संबंधित भागातील पूर्वतय्यारी व स्वछता तात्काळ करा – युवक काँग्रेस ची मागणी

निलंगा तालुका प्रतिनिधि: निलंगा शहरातील हजरत पिरपाशा ( रह.) दर्गा यांची वार्षिक जत्रा (उरूस) अवघ्या काही दिवसांवर आले असून संबंधित भागातील स्वच्छता तात्काळ करा अशा मागणीचे निवेदन निलंगा युवक काँग्रेस तर्फे शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निलंगा येथील हजरत पिरपाशा दर्गा येथील वार्षिक जत्रा अवघ्या काही दिवसावर आली असून दरवर्षी या जत्रे निमित्त नगरपरिषद मार्फत संपूर्ण स्वछता, स्ट्रीट लाईट गावत, काटेरी झाडे झूडपे काढणे अशी कामे केली जातात पण यावर्षी अद्याप काहीच केले.

नसल्याने तात्काळ संबंधित भागातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, नाल्याची स्वच्छता, स्ट्रीट लाईट, नाल्यावरील जाळ्या बसवणे, दर्गा परिसरातील संपूर्ण स्वछता तात्काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर युवक शहराध्यक्ष मुजीब सौदागर, सबदर कादरी, आवेज शेख,कादरी मुजम्मील,काझी मोईज, शेख गौस, हिरा कादरी,साबेर मणियार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks