स्वारीपच्या चिंतन बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा – पंडीत ओव्हाळ

माजलगांव / ( पृथ्वीराज निर्मळ )

तालुक्यातील सध्याची राजकिय व सामाजीक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वारिपचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या महत्वपूर्ण बैठकीस माजलगांव तालुक्यातील स्वारिपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष पंडित ओव्हाळ यांनी केले आहे

माजलगांव तालुक्यातील दलित चळवळ सध्या आधोगतीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र असून एकाच ठिकाणी सत्तेचे केंद्र निर्माण करून इतर कार्यकर्त्यांना उधवस्त करण्याची राजनिती तालुक्यातील सत्ताधा-यांनी निर्माण केलेली आहे . सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेचे आमीष दाखवून त्यांना लाचार बनवण्याचे षडयंत्र राज्यकर्त्याचे दलाल करत आहेत.

स्वतः मोठे होवून आंबेडकरी चळवळ छोटी करण्याचे मनसुबे येथील राज्यकर्त्यांचे असून आशांना लगाम घालण्याची वेळ आता आलेली आहे .भविष्य काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बुलंद करण्यासाठी समाजातील तळागळातील कार्यकर्त्यांना ताकद देवून एकनिष्ठ व सक्षम कार्यकर्ते बनवून त्यांना नविन दिशा देण्यासाठी चिंतन करून मार्ग काढण्यासाठी दि. १८ जून रविवार रोजी ठिक ११ :०० वाजता व्यंकटेश हॉल माजलगांव येथे स्वाभीमानी नेते विजयदादा साळवे यांच्या मार्गदर्शना खाली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आयोजित केली असल्याचे स्वारिपचे तालुकाध्यक्ष पंडीत ओव्हाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks